Advertisement

जोगेश्वरी भूखंड प्रकरण: 4 निलंबित, 18 जणांवर ठपका

जोगेश्वरी पूर्व येथील रुग्णालय, मनोरंजन मैदान आणि रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंड प्रकरणी महापालिकेच्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून 18 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

जोगेश्वरी भूखंड प्रकरण: 4 निलंबित, 18 जणांवर ठपका
SHARES

जोगेश्वरी पूर्व येथील रुग्णालय, मनोरंजन मैदान आणि रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंड प्रकरणी महापालिकेच्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून 18 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये विधी विभागाचे एक उपकायदा अधिकारी आणि विकास नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आणि दुय्यम अभियंता अशा चार जणांचा सामावेश आहे.


समिती गठीत

जोगेश्वरी येथील मनोरंजन मैदान, रुग्णालय आणि रस्त्यासाठी आरक्षित असलेला तब्बल 13 हजार चौरस मीटर भूखंड केवळ विधी विभागाच्या निष्काळजीपणामुळे हातचा गेला. आयुक्तांच्या शेऱ्यात खाडाखोड करत अधिकाऱ्यांना हाताशी धरत महापालिकेच्या ताब्यात येणारा भूखंड परत मालकाला देण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे विधी विभागाच्या तसेच विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.


अहवाल सादर

या समितीने आपला अहवाल आयुक्त अजोय मेहता यांना काही दिवसांपूर्वी सादर केला होता. त्यावर शेवटचा हात फिरवत आयुक्तांनी तो अहवाल सोमवारी संध्याकाळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर 6 जणांना दोषी ठरवण्यात आलं. शिवाय 7 अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.


'अधिकाऱ्यांना निलंबित करा'

याची चौकशी करताना विधी विभागाच्या 6 आणि विकास नियोजन विभागाच्या 15 ते 16 अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. यासर्वांची चौकशी करून याचा अहवाल बनवला आहे. यात 4 विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्याची शिफारस आयुक्तांनी केली आहे.


निलंबित अधिकारी

  • अशोक शेंडगे, कार्यकारी अभियंता
  • विजय कुमार वाघ, सहायक अभियंता
  • गणेश बापट, दुय्यम अभियंता
  • पी. व्ही. नाईक, उपकायदा अधिकारी


खात्यांतर्गत सर्वंकष चौकशी

विकास नियोजन विभाग

  • भास्कर चौधरी उपप्रमुख अभियंतe
  • विजय पाटील, कार्यकारी अभियंता
  • संजय पंडित,कार्यकारी अभियंता
  • आर्वीकर, सहायक अभियंता
  • गणेश पवार, दुय्यम अभियंता


विधी विभाग

  • नासिर शेख, प्रमुख कायदा अधिकारी(निवृत्त)
  • उज्ज्वला देशपांडे, प्रमुख कायदा अधिकारी(निवृत्त)
  • झेवीयर्स, प्रमुख कायदा अधिकारी


खात्यांतर्गत चौकशी

विकास नियोजन विभाग

  • संजय दराडे, प्रमुख अभियंता
  • सुरेंद्र चव्हाण, उपप्रमुख अभियंता
  • विवेक मोरे, उपप्रमुख अभियंता
  • महेंद्र मुळे, उपप्रमुख अभियंता


विधी विभाग

  • के.एन.गायकवाड सहकायदा अधिकारी
  • व्ही एस. घारपुरे, उपकायदा अधिकारी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा