Advertisement

भायखळ्यातील लाकडी गोदामाला भीषण आग

दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागली.

भायखळ्यातील लाकडी गोदामाला भीषण आग
A level-2 fire incident took place near Mustafa Bazar in Byculla around 5.30 am. Rescue operation is underway. (Twitter/ANI)
SHARES

दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागली. भायखळ्यातील मुस्तफा बाजारजवळील एका लाकडी गोदामाला पहाटे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्यापर्यंतर तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळी ६ वाजता लागलेली आग आटोक्यात आली आहे. कोणतीही दुखापत किंवा अपघाताची नोंद नाही; आग विझवण्याचे काम अद्याप सुरू आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा