Advertisement

महाराष्ट्रातील तिन्ही कंपन्यांच्या वीज कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

राज्य सरकारने वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील तिन्ही कंपन्यांच्या वीज कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ
SHARES

वीज विभागांतर्गत महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के तर सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी यासंदर्भातील माहिती दिली.  

देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह इथे ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड या राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनर्नियोजनाबाबत माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra fadanvis) म्हणाले की, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिट, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा 5 हजार रुपये भत्ता, तर सहायकांचा भत्ता वाढवून 1000 रुपये करण्यात आला आहे.

या बैठकीत ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, तसेच तिन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी व संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.



हेही वाचा

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा