Advertisement

जगातील सर्वात मोठी सर्कस मुंबईत

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माध्यमातून मुंबईतील एमएमआरडीए मैदानात गुरूवारपासून या सर्कशीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सर्कशीत भारतातील प्रसिद्ध मलखांबपटू राजेश मटकर देखील आपली कला दाखवणार आहेत.

जगातील सर्वात मोठी सर्कस मुंबईत
SHARES

सर्कस बघायला कुणाला आवडणार नाही. त्यातच जगातील सर्वात मोठी सर्कस मुंबईत बघायला मिळणार असेल, तर मज्जाच मज्जा. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माध्यमातून मुंबईतील एमएमआरडीए मैदानात गुरूवारपासून या सर्कशीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सर्कशीत भारतातील प्रसिद्ध मलखांबपटू राजेश मटकर देखील आपली कला दाखवणार आहेत. या कॅनेडीयन सर्कशीचं नाव 'सरक्यू डू सोलेल' असं आहे.


४९ देशातील कलाकार

कॅनेडीयन सर्कशीत तब्बल ४९ देशांतील कलाकारांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या 'व्हिजीत महाराष्ट्र' उपक्रमांतर्गत या सर्कशीचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. 'सरक्यू डू सोलेल' या सर्कशीची जगातील सर्वात मोठी सर्कस अशी ख्याती आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी या सर्कशीचं आयोजन मुंबईत करण्यात आलं आहे.


कधीपासून सुरू?

बीकेसीतील एमएमआरडीए मैदानात ही सर्कस गुरूवार १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून ९ डिसेंबरपर्यंत ही सर्कस सुरू राहणार आहे. या सर्कशीचा रोज एक आणि शनिवार, रविवारी दोन शो होतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा