Advertisement

साकीनाका दुघर्टनेची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश

साकीनाका खैराणी रोडवरील फरसाण दुकानाला लागलेल्या आगीत १२ जणांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे, या प्रकरणाची त्वरीत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महापालिका सभागृहात करण्यात आली. त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका प्रशासनाला यासंदर्भात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

साकीनाका दुघर्टनेची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश
SHARES

साकीनाका खैराणी रोडवरील फरसाण दुकानाला लागलेल्या आगीत १२ जणांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे, या प्रकरणाची त्वरीत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महापालिका सभागृहात करण्यात आली आहे. त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका प्रशासनाला यासंदर्भात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


दुकानांच्या तपासणीची मागणी

साकीनाका खैराणी रोडवरील फरसाण दुकानाला पहाटे लागलेल्या आगीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. याबद्दल महापालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट न पाहता शहरातील सर्व दुकानांची त्वरीत तपासणी करण्याची मागणी केली. एवढंच नव्हे, तर महापौरांनी पुढाकार घेऊन अशा घटना का घडतात याची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत अशा सूचना केल्या.



भाजपाच्या आनंदावर विरजण

मुंबई महापालिकेच्या प्रभाग २१ मधील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार प्रतिभा गिरकर विजयी झाल्यामुळे तसेच गुजरात व हिमाचल विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यामुळे सोमवारी झालेल्या महापालिका सभेत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्याचा विचार होता. साकीनाका दुघर्टनेमुळे भाजपाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. या दुघर्टनेमुळे महापालिकेचं कामकाज केवळ मृतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आलं.



उपायुक्तांची चौकशी समिती

साकीनाका आगीच्या दुघर्टनेची चौकशी करण्यासाठी उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खात) राम धस आणि प्रमुख अग्निशमन दल अधिकारी यांची समिती नेमण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्राधिकरणांकडून खाद्यपदार्थ बनवण्यासाठी कारखान्याला लागणारा परवाना व ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलं की नाही याबाबींची पूर्तता न केल्याचं आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा