Advertisement

वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

आरोग्य विभागात ‘गट ब’ मधील पदांवर कार्यरत असलेल्या जवळपास 750 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारने मागील अनेक वर्षांपासून पदोन्नती दिलेली नाही.

वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत
SHARES

आरोग्य विभागात (health department) ‘गट ब’ मधील पदांवर कार्यरत असलेल्या जवळपास 750 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारने मागील अनेक वर्षांपासून पदोन्नती (promotion) दिलेली नाही. त्यातील अनेक अधिकाऱ्यांची सेवा 24 वर्षे सेवा झाली आहे.

आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयांत ‘गट ब’ संवर्गातील अधिकारी कार्यरत आहेत. राज्यात (maharashtra) आरोग्य विभागातील विविध कार्यालयांमध्ये जवळपास 750 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सरकारी नियमानुसार नियुक्तीनंतर तीन वर्षांनी पदोन्नती मिळणे गरजेचे असते.

मात्र ‘गट ब’ संवर्गामध्ये कार्यरत असलेल्या जवळपास 750 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती झाल्यापासून एकदाही पदोन्नती मिळालेली नाही. त्यातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची 24 वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे.

अनेक वैद्यकीय अधिकारी कोणतीही पदोन्नती न घेता निवृत्त (retirement) झाले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना मानसिक तणावालाही सामोरे जावे लागते आहे, असे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बीएएमएस (BAMS) झालेल्या, ‘गट ब’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती न दिल्याने त्यांच्यासाठी असलेला पदोन्नतीचा कोटा अनेक वर्षांपासून तसाच आहे.

कोटानिहाय उपलब्ध असलेल्या जागेनुसार सध्या जवळपास 250 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘गट अ’ संवर्गात पदोन्नती मिळू शकते. मात्र वेळेवर पदोन्नतीची प्रक्रिया न केल्याने अनेक अधिकारी पदोन्नतीशिवायच निवृत्त झाले आहेत.

त्यामुळे ‘गट ब’ संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघ मागील तीन वर्षांपासून प्रयत्नशील आहे.

सर्व उपसंचालक कार्यालयामार्फत ‘गट ब’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव जून 2023 पूर्वी संचालक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.

तसेच पदोन्नतीचे परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ व काल मर्यादेत सादर करण्याबाबत आरोग्य विभागाच्या सचिवांना 13 स्मरणपत्रे पाठवण्यात आली आहेत. तरीही गट ब मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

जानेवारी 2024 मध्ये रोजी गट अ संवर्गात 283 पदांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सरळसेवा पदभरती जाहीर केली. त्यामुळे अनेक वर्ष सेवा करून न्याय मिळत नसल्याने ‘गट ब’ अधिकारी यांच्यामध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी सांगितले. यासंर्भात आरोग्य विभागाचे सचिव निपूण विनायक यांना दूरध्वनी केला, तसेच संदेश पाठविला. मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.



हेही वाचा

नवी मुंबई : 4 फेब्रुवारी रोजी 10 तासांसाठी पाणीकपात

राज्यातील 80% शाळांमध्ये डिजिटल लर्निंगचा पर्याय

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा