Advertisement

ठाणे- वाशी खाडी लवकरच प्रदूषणमुक्त

यासाठीचा प्रस्ताव एमआयडीसीने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवला आहे.

ठाणे- वाशी खाडी लवकरच प्रदूषणमुक्त
SHARES

ठाणे (Thane) - बेलापूर (Belapur) औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने असलेल्या रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी (waste water)वाहून नेणारी 27 वर्ष जुनी 3.6 किलोमीटर वाहिनी नव्याने उभारणार आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

यासाठीचा प्रस्ताव एमआयडीसीने महाराष्ट्र (maharashtra) किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवला आहे. यासाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून महत्त्वाचे सल्लेही देण्यात आले आहेत. याबाबत महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची नुकतीच बैठक पार पडली.

यामुळे सद्यस्थितीतील वाहिनीलगतच नवीन वाहिनी उभारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे जुन्या वाहिनीतून होणाऱ्या सांडपाण्याच्या गळतीतून ठाणे – वाशी खाडीला आणि आसपासच्या परिसराला मुक्तता मिळण्याची सकारात्मक चिन्हे दिसून येत आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ठाणे – बेलापूर औद्योगिक क्षेत्र ओळखले जायचे. सुरुवातीच्या काळात अनेक अभियांत्रिकी कंपन्या या ठिकाणी उभ्या राहिल्या. यानंतर येथील ठाणे आणि वाशी खाडीचा भौगोलिक भाग पाहता परदेशातून आणि देशभरातून अनेक रासायनिक कंपन्यांनी या ठिकाणी आपला जम बसवला.

मात्र यानंतर खाडीत सांडपाणी थेट सोडले जाऊ लागल्याने खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ लागले. यानंतर येथील सर्व मोठ्या व लहान उद्योजकांनी एकत्रित येऊन येथील रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी यासाठी पुढाकार घेतला.  तसेच वारंवार पाठपुरावा करून नवी मुंबईतील (navi mumbai) पावने येथे सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले.

यानंतर येथून रासायनिक कंपन्यांच्या (chemical company) सांडपाण्यावर प्रक्रिया करून ठाणे खाडीत सोडण्यात येऊ लागले. याच केंद्रातून सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी जुनी झाली आहे. त्यासाठी नव्याने वाहिनी टाकण्यासाठी एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत.



हेही वाचा

राज्यात तीन दिवस थंडीची तीव्र लाट, IMD चा अंदाज

6 महिन्याच्या चिमुकलीला HMPV संसर्ग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा