कोरोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे. त्यांच्यासोबत अन्य काही लोकांनीही सेल्फ क्वारंटाइन केलं आहे.
जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या मुंब्रा येथील पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले आहेत. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. काही पत्रकारही या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आले असल्याचं समजतं. त्यांनाही सेल्फ क्वारंटाइनचा सल्ला प्रशासनानं दिला आहे. या कोरोना पॉझिटिव्ह पोलिस उपनिरीक्षकाच्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या संकटात शासन आणि प्रशासनातील लोक रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत आहेत. समन्वयाच्या निमित्तानं त्या-त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्याशी सतत संपर्क येत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील आपला मतदारसंघ असलेल्या कळवा आणि मुंब्र्यात रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या स्थितीचा वारंवार आढावा घेत होते. त्यावेळी त्यांच्या एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क आला जो आता कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. आव्हाड यांच्यासह काही पत्रकार व स्थानिक राजकीय कार्यकर्तेही या पोलिसाच्या संपर्कात होते. त्यामुळं प्रशासनानं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा -
जी दक्षिण विभागात २५० कोरोनाग्रस्त
मुंबईसहीत ८ जिल्हे रेड झोनमध्ये, पुढं काय होणार?