Advertisement

मुंबईत 10 टक्के पाणीकपात!

ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिणाम

मुंबईत 10 टक्के पाणीकपात!
SHARES

मुंबई नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईत पुढील पाच दिवस पाणी कपात केली जाणार आहे. तब्बल १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

मुंबई महागर पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे या यंत्रणेची दुरुस्ती केली जाणार आहे. हे काम आज पासून हाती घेण्यात येणार असून यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

या सोबतच उपनगर, ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा देखील विस्कळीत होणार आहे. परिणामी पालिकेने पुढील 10 दिवस 10 टक्के कपातीची घोषणा केली आहे.

या पूर्वी देखील दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प झाला होता. लोअर परळ येथील तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील काही भागातील पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता पिसे येथील पाणी पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने पाणी कपात केली जाणार आहे.

पालिकेने दिलेल्या महितीनुसार, न्यूमॅटिक गेट सिस्टिममच्या बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक दुरुस्तीचे काम आजपासून हाती घेण्यात आले आहे.

महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर - उपनगर, ठाणे व भिवंडी भागाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे, भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात आली आहे.



हेही वाचा

भांडुप : श्वानाला इजा केल्याप्रकरणी शिक्षिकेची शेजाऱ्याविरुद्ध तक्रार

एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बस बंद होण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा