Advertisement

मुंबई : अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग, तिघांचा मृत्यू

अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, आग पहिल्या फ्लोरवर असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे

मुंबई : अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग, तिघांचा मृत्यू
SHARES

मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेसमध्ये 16 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, आग पहिल्या फ्लोरवर असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

रिया पॅलेस ही मुंबईतील लोखंडवाला येथील 14 मजली इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत जखमी झालेल्या लोकांना जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती कूपर हॉस्पिटलने दिली आहे. त्यापैकी दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. चंद्रप्रकाश सोनी (74), कांता सोनी (74) आणि पेला बेटा (42) अशी मृतांची नावे आहेत.

आगीचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास सुरू आहे.




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा