Advertisement

घाटकोपर-अंधेरी शटल मेट्रो सेवा सुरू होणार

2024 मध्ये घाटकोपर -वर्सोवा- घाटकोपर ही मेट्रो सेवा सुरू झाली होती.

घाटकोपर-अंधेरी शटल मेट्रो सेवा सुरू होणार
SHARES

लवकरच घाटकोपर ते अंधेरीदरम्यान विशेष मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. घाटकोपरवरून वर्सोवाऐवजी घाटकोपर -अंधेरी ही विशेष आणि थेट मेट्रो धावणार आहे.

सकाळच्या गर्दीवर मात करण्यासाठी मेट्रो- 1 अशाप्रकारचे नियोजन करताना दिसत आहे. यामुळे घाटकोरवरून अंधेरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त होण्यास मदत होईल.

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोला प्रवाशांकडून खूप चांगली पसंती मिळते. या मेट्रोला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. याच गर्दीवर मात करण्यासाठी मेट्रो- 1 विशेष मेट्रो सेवा सुरू करत आहे. यासाठी घाटकोपर ते अंधेरी अशी विशेष आणि थेट मेट्रो धावणार आहे.

2024 मध्ये घाटकोपर -वर्सोवा- घाटकोपर ही मेट्रो सेवा सुरू झाली होती. ही राज्यातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेली मार्गिका आहे. या मार्गावर दिवसाला 4.80 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. महत्वाचे म्हणजे हा मेट्रोमार्ग प्रवाशांच्या पसंतीचा आहे. या मार्गावर फक्त 4 डब्यांची मेट्रो धावते. त्यामुळे सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते. घाटकोपर ते अंधेरी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता या मार्गावर विशेष मेट्रो सुरू करण्यात येणार आहे.

मेट्रो प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मेट्रोने घाटकोपर ते अंधेरीदरम्यान विशेष आणि थेट मेट्रो गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर घाटकोपर-अंधेरी शटल सुरू झाल्यास प्रवाशांना गर्दीमुक्त प्रवास करता येईल. सध्या मेट्रो -1 प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न केले जात आहे.



हेही वाचा

नाशिक, पुण्यासाठी मेमू ट्रेन सेवा सुरू करण्याची मागणी

भाईंदरपाडा ते विहांग हिल्स मार्गावर पॉड टॅक्सी धावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा