सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो (mumbai metro) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 दरम्यान 8,500 हून अधिक प्रवाशांनी (passengers) प्रवास केला. रात्री 9 वाजेपर्यंत एकूण प्रवासी संख्या ही 15,700 वर पोहोचली होती. अवघ्या तीन तासात 7,000 प्रवाशांनी प्रवास केला.
मेट्रो लाइन 3 (metro line 3) सेवेचा प्रवास केल्यानंतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया सकारात्मक होत्या. तथापि, प्रवाशांना काही किरकोळ समस्या जाणवल्या.
पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या 10 स्थानकांपैकी मरोळ नाक्यावर सर्वाधिक लोकांची गर्दी झाली होती. सहार रोड, CSMIA-T2 आणि CSMIA-T1 सारखी काही स्थानके बहुतेक रिकामी होती. मात्र, नव्याने सुरू झालेल्या स्थानकांचा वापर करताना प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
नवीन मेट्रोबद्दल (aqua line) लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र तिकीट व्हेंडिंग मशीनमध्ये मोठ्या रकमेच्या नोटा स्वीकारण्याबाबत समस्या होत्या. तसेच त्यात क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. काही गाड्यांना थोडासा विलंबही झाला होता, मात्र मेट्रो अधिकाऱ्यांनी त्वरीत या समस्यांचे निराकरण केले.
एक्वा लाइनच्या या पहिला टप्प्यात BKC, SEEPZ आणि मरोळ नाका ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. संपूर्ण एक्वा लाइन पूर्ण झाल्यावर मेट्रोच्या 260 फेऱ्या चालवल्या जातील. तसेच यावरून दररोज 17 लाख प्रवाशांची वाहतूक होईल अशी अपेक्षा आहे.
मेट्रो भूमिगत चालत असल्याने स्थानके इतर मार्गांपेक्षा मोठी आहेत. प्रत्येक स्थानकावर स्वयंचलित जिने बसवले आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीसाठी इतर सार्वजनिक वाहतूक पर्यायांना जोडण्यासाठी काम करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, 5 ऑक्टोबर रोजी आरे कॉलनी - JVLR ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ला जोडणाऱ्या ॲक्वा लाइनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते.
हेही वाचा