Advertisement

काँक्रिट रस्त्यांच्या दर्जासाठी 'आयआयटी'ची नियुक्‍ती

IIT बॉम्बेचा BMC सोबत सामंजस्‍य करार

काँक्रिट रस्त्यांच्या दर्जासाठी 'आयआयटी'ची नियुक्‍ती
SHARES

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे प्रगतीपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी IIT बॉम्बेची नेमणूक करण्यात आली आहे.

यापुढे मुंबईत रस्ते विकासाची कामे करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी IIT कडे असेल. या कामकाजासाठी महानगरपालिका आणि IIT यांच्‍यात बुधवार 11 सप्‍टेंबर रोजी सामंजस्‍य करार करण्‍यात आला.

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या करण्‍यात आल्‍या.

महानगरपालिकेच्‍यावतीने प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) गिरीश निकम यांनी, तर भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या वतीने अधिष्‍ठाता (संशोधन व विकास) प्रा. सचिन पटवर्धन यांनी स्‍वाक्षरी केली. यावेळी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे उपसंचालक प्रा. के. व्‍ही. कृष्‍ण राव, अधिष्‍ठाता पी. वेदगिरी, प्रा. सोलोमन देबबर्मा यांच्‍यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात 392 किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात 309 किलोमीटर असे एकूण 701 किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.

आयआयटीची जबाबदारी?

  • रस्‍त्‍यांच्‍या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्‍य पद्धती निश्चित करण्‍यासाठी आवश्‍यक सल्‍ला देणे
  •  गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे 
  • गुणवत्तेची खात्री करण्यासाठी चाचण्या घेणे
  • गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे
  • तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे 
  • गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्‍पस्‍थळास भेटी देणे 



हेही वाचा

घोडबंदर रोडवरील खड्डे लवकरच बुजवले जाणार : PWD

मरोळमध्ये अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्यात येणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा