मान्सून परतीच्या वाटेवर असताना महाराष्ट्रात सातत्याने पाऊस पडत आहे. मुंबईला (mumbai) या आठवड्यात मुसळधार पावसाने झोडपले आहे. गेल्या बुधवारी संध्याकाळी रेड अलर्टचा (red alert) इशारा दिला गेला होता.
मुंबईचा विचार करता, या शहराने 2319 मिमीच्या वार्षिक पावसाची सरासरी ओलांडली आहे. बुधवार आणि गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर, कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेत 26 सप्टेंबरपर्यंत 2302 मिमी आणि 3016 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात एकूण 104.36 टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती आज (शुक्रवारी सकाळी) महापालिकेने दिली.
गेल्या वर्षी याच दिवशी कुलाबा वेधशाळेत 2349.7 मिमी तर सांताक्रूझ वेधशाळेत 2981 मिमी पावसाची नोंद झाली होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (bmc) आकडेवारीनुसार, गुरुवारपर्यंत (26 सप्टेंबर) पूर्व उपनगरात 2820.18 मिमी, पश्चिम उपनगरात 2703.64 मिमी आणि शहरात 2450.67 मिमी पाऊस झाला (mumbai rains) आहे.
IMD ने गुरुवारी सकाळपर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट आणि दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या 24 तासात (शुक्रवार सकाळी 8 वाजेपर्यंत) पश्चिम उपनगरात 74.46 मिमी, पूर्व उपनगरात 49.07 मिमी आणि शहरात 22.93 मिमी पाऊस झाला आहे.
हेही वाचा