Advertisement

ख्रिसमसनंतर मुंबईत गारठा जाणवणार

हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ख्रिसमसनंतर मुंबईत गारठा जाणवणार
SHARES

25 डिसेंबर ख्रिसमसनंतर मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

मंगळवारी, 19 डिसेंबर रोजी, IMD च्या सांताक्रूझ रेकॉर्डिंग स्टेशनवर किमान तापमान 23.7 अंशांवर पोहोचले, जे सामान्यपेक्षा सहा अंशांनी जास्त होते.

दरम्यान, कुलाबा वेधशाळेत, किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस होते, जे 12 डिसेंबर रोजी नोंदवले गेलेल्या हंगामातील सर्वात कमी तापमानाच्या समांतर होते.

सोमवार, 18 डिसेंबर रोजी, सांताक्रूझमधील किमान तापमान 23.6 अंशांवर पोहोचले, तर कुलाबा कोस्टल स्टेशनमध्ये 24 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

याशिवाय मुंबईतील हवेचा दर्जा निर्देशांक या आठवड्यात दोन दिवस मध्यम श्रेणीत नोंदवली गेली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी धुके जाणवेल. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा