Advertisement

मुंबईला 250 नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळणार

बृहन्मुंबई ईलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टने (बेस्ट) पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स सोबत करार करून 250 ईलेक्ट्रिक बस सेवेत दाखल केल्या आहेत.

मुंबईला 250 नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळणार
SHARES

बृहन्मुंबई ईलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टने (बेस्ट) (brihanmumbai electric supply and transport) पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स सोबत करार करून 250 ईलेक्ट्रिक बस सेवेत दाखल केल्या आहेत. दिल्लीतील पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स कंपनी टप्प्याटप्प्याने बसेसचा पुरवठा वितरित करणार आहे. 

पीएमआय कंपनीचा बेस्टसोबत (best) मुंबईतील (mumbai) इलेक्ट्रिक बससाठी हा पहिलाच करार आहे. हा उपक्रम केंद्र सरकारच्या ई-ड्राईव्ह योजनेचाच भाग आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 2026 च्या अर्थसंकल्पातून 10,900 कोटींच्या बजेटपैकी 40 टक्के बजेट सार्वजनिक वाहतुकीसाठी मंजूर केला आहे.

नवीन ईलेक्ट्रिक बसेस (electric bus) वेट-लीज मॉडेल अंतर्गत चालवल्या जातील. या व्यवस्थेअंतर्गत बसेसची मालकी ही पीएमआय (PMI) कंपनीकडे असेल तर बेस्टतर्फे त्या बसेस चालवल्या जातील.

ऑलेक्ट्रा या आणखी एका कंपनीचे बेस्टसोबत करार आहेत. या कंपनीसोबत बेस्टचा 2,400 बसेसचा करार आहे. या अतिरिक्त बसेसमुळे बसफेऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक बंद झालेल्या अनेक मार्गांवरची बससेवा पूर्ववत होईल.

पीएमआय कंपनीच्या बसेस 30 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होतात. तसेच ते एका चार्जमध्ये 180 किलोमीटरपर्यंत धावू शकतात. कंपनीने यापूर्वी नागपूरच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी बसेस चालवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतही ही कंपनी आपल्या बसेस चालवणार आहे.

बेस्टने आपला ताफा वाढवण्यासाठी इतर ऑपरेटरसोबत अनेक करार केले आहेत. यामध्ये कॉसिस कंपनीच्या 700 डबल डेकर बसेस, मातेश्वरी कंपनीच्या 200 सीएनजी बसेस, ऑलेक्ट्राच्या 2,100 इलेक्ट्रिक बसेस आणि स्विच मोबिलिटीच्या 200 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे.

सध्या बेस्टच्या 2,940 बसेसपैकी 1,836 बस कंत्राटदार चालवतात. बेस्टच्या मालकीच्या ताफ्यामध्ये सातत्याने घट होत आहे. यामुळे बेस्ट कंत्राटदारांवर अधिक अवलंबून राहत आहे. म्हणूनच या करारांद्वारे सेवा सुधारण्याचा आणि सार्वजनिक परिवहनाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.



हेही वाचा

मुंबईकर गारठले! किमान तापमानात घट

वसईत सिमेंट कारखान्यांमुळे वाढते प्रदूषण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा