Advertisement

मुंबईत कृत्रिम बेटावर ऑफशोअर विमानतळ उभारणार

प्रशासकीय अधिकारी लवकरच भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत प्रकल्पाचा अभ्यास सुरू करतील.

मुंबईत कृत्रिम बेटावर ऑफशोअर विमानतळ उभारणार
SHARES

केंद्र सरकार मुंबईजवळील (mumbai) पहिले ऑफशोअर विमानतळ (offshore airport) बांधण्याची योजना आखत आहे. हे विमानतळ वाढवण बंदराजवळील एका कृत्रिम बेटावर तयार करण्यात येईल.

हे विमानतळ मुंबईच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर असेल. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेचा एक भाग आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, महाराष्ट्र सरकार तसेच केंद्रीय पर्यावरण आणि संरक्षण मंत्रालयांनी गेल्या महिन्यात या प्रकल्पाला प्राथमिक मान्यता दिली. तसेच प्रशासकीय अधिकारी लवकरच भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत प्रकल्पाचा अभ्यास सुरू करतील.

या अभ्यासातून अंदाजे गुंतवणूक खर्च निश्चित केला जाईल. तसेच या प्रकल्पामुळे हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे.

नवीन विमानतळ हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ओसाकामधील कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखेच असेल. हे दोन्ही विमानतळ कृत्रिम बेटांवर बांधले गेले आहेत.

हे विमानतळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरला जोडले जाईल. मुंबई-वडोदरा आणि नवी दिल्ली-मुंबई रस्ते हे दोन प्रमुख महामार्ग देखील या विमानतळाला जोडले जातील.

प्रस्तावित ऑफशोअर विमानतळ हे या प्रदेशातील तिसरे विमानतळ असेल. मुंबईजवळ तिसऱ्या विमानतळाची योजना ही काही नवीन नाही. पूर्वी, पालघर (palghar) जिल्ह्यातील केळवा-माहीम किंवा दापचरी भागात देशांतर्गत विमानतळ प्रस्तावित होते.

2013 मध्ये, नेदरलँड्स एअरपोर्ट कन्सल्टंट्सने जवाहरलाल नेहरू बंदराजवळ पुर्नप्राप्त जमिनीवर विमानतळ बांधण्याचा सल्ला दिला. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (mumbai airport) हे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर भारतातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

ऑक्टोबर 2024 मध्ये, मुंबई विमानतळावर 31.6 लाख देशांतर्गत प्रवाशांची नोंद झाली. येथून दररोज 900 विमानं उड्डाण तसेच उतरली जातात.

तज्ञांचे म्हणणे आहे की विमानतळ आधीच पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, ज्यामुळे विमानांच्या उड्डाणांना वारंवार विलंब होत आहे. एअर इंडियाने देखील विमानतळावरील गर्दीमुळे विमानांच्या उड्डाणांना उशीर होत असल्याचे कारण सांगितले.

जगातील सर्वात मोठे ऑफशोअर विमानतळ, चीनचे डालियान जिन्झू बे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे 2035 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.



हेही वाचा

फुकट्या प्रवाशांवर बेस्टची कारवाई

मिठी नदी स्वच्छतेतील घोटाळा; तीन कंत्राटदारांची चौकशी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा