Advertisement

टोमॅटो आणि मटारच्या दरात वाढ

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आणि मटारची आवक कमी झाली असून दरात वाढ झाली आहे.

टोमॅटो आणि मटारच्या दरात वाढ
SHARES

मुंबई (mumbai) कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो (tomato) आणि मटारची (peas) आवक कमी झाली आहे. यामुळे दरात वाढ झाली आहे. मागील एक महिन्यापासून टोमॅटो दर आवाक्यात होते. परंतु टोमॅटोच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे.

टोमॅटोचा भाव प्रतिकिलो चाळीस रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मटारच्या दरातही (rate) भरमसाठ वाढ झाली आहे.

बदलत्या वातावरणाने टोमॅटोच्या दर्ज्यावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर परतीच्या पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने बाजारात सध्या आवक कमी होत आहे. त्यामुळे टोमॅटो आणि मटारच्या दराने उच्चांक गाठला आहे. 

बाजारात 28 गाड्यांद्वारे 1468 क्विंटल टोमॅटो आवक झाली आहे. तसेच दरात प्रतिकिलो 10-12 रुपयांची वाढ (increased) झाली आहे. मंगळवारी घाऊक बाजारात टोमॅटोची प्रतिकिलो 40 रुपयांनी विक्री झाली आहे. 

मागील काही दिवसांपासून मटारचे दर आवाक्यात आले होते. परंतु मंगळवारी पुन्हा घाऊक बाजारात मटारची आवक घटल्याने (decreased) दरात प्रतिकिलो 15-20 रुपयांनी वाढ झाली आहे. 

घाऊक बाजारात आधी प्रतिकिलो 65-70 रुपयांनी उपलब्ध असलेली मटार आता 80-90 रुपयांनी विकला जात आहे. मटारचीही आवक कमी झाली आहे. मंगळवारी 20 गाड्यांमधून 935 क्विंटल मटार बाजारात दाखल झाला आहे. 

राज्यातील सातारा आणि नाशिक येथील मटार बाजारात दाखल होत आहे. तर परराज्यातील आवक कमी झाली आहे. पावसामुळे उत्पादन कमी झाले आहे त्यात वातावरण बदलाचा फटका बसत असल्याने आवक आणखीन कमी होत आहे.

तसेच मटारला ज्याठिकाणी अधिक बाजारभाव (market price) आहे त्याठिकाणी त्याचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे ही एपीएमसीत आवक मंदावली आहे. यंदा मटारचे उत्पादन आणि आवक कमीच असेल अशी माहिती व्यापारी बाळासाहेब बडदे यांनी दिली.

एपीएमसीत डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होतो. शिवाय डिसेंबरमध्ये मटारचा खरा हंगाम सुरू होतो. तर वर्षभर मटार तुरळक प्रमाणात दाखल होत असतात. 

बाजार समितीत राज्यातील आणि मध्य प्रदेशातून मटारची आवक मोठ्या प्रमाणात होते. मात्र सध्या परतीच्या पावसामुळे मटारच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमीच आहे.

पावसामुळे उत्पादन कमी त्यात वातावरण बदलाचा फटका टोमॅटो आणि मटारला बसला आहे. परिणामी आवक घटून दर वाढले आहेत.



हेही वाचा

दक्षिण मुंबईत 5 डिसेंबरला वाहतुकीत बदल, 'हे' मार्ग वळवले

डिसेंबरमध्ये 'या' दिवशी मुंबईकरांना सुट्टी जाहीर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा