गुगल मॅप्सवर मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे नाव "वेस्टर्न अर्बन रोड" असे ठेवण्यात आले आहे. परंतु या बदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने मुंबईकर गोंधळलेले आहेत. ट्विटरवर यासंदर्भातील काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. तथापि, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे नाव बदलण्याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. फ्री प्रेसने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
ट्विटरवर एका युझरने म्हटले की, "महानगराच्या काही भागात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे नाव वेस्टर्न अर्बन रोड असे करण्याची हिंमत कोणी केली."
Who dared to @googlemaps Western Express Highway rename as WESTERN URBAN ROAD in some part of metropolis as in screenshot of @GoogleIndia ?@MMRDAOfficial@mybmc @CMOMaharashtra @AndheriLOCA @MTPHereToHelp pic.twitter.com/njEwroKfjS
— Responsibly Educated Literate Citizen (@CitizenLiterate) March 5, 2025
दुसऱ्या युझरने म्हटले की, "वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे नाव आता वेस्टर्न अर्बन रोड असे ठेवण्यात आले आहे!"
Western Express Highway is now renamed as Western Urban Road!!! WTH 🤦 pic.twitter.com/CehsqYxROw
— Aditya Pal (@aditya__pal) March 4, 2025
तिसऱ्या युझरने नमूद केले की, "वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) आता मुंबईतील वेस्टर्न अर्बन रोड म्हणून ओळखले जाते. पण या नावातील बदलांमुळे दैनंदिन प्रवाशांना फायदा होईल का? तुमचे लक्ष चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर असले पाहिजे''.
Western Express Highway (WEH) is now Western Urban Rd in Mumbai. But will changing names do any good for the daily commuters? Focus should be to create ample infrastructure #Mumbai pic.twitter.com/vlc1rKaGvI
— Sanjay Koul 𑆱𑆁𑆘𑆪 𑆑𑆿𑆬 (@budgamboy) March 4, 2025
हेही वाचा