Advertisement

ठाणे, पालघर जिल्ह्यात १० एप्रिलला राष्ट्रीय लोक न्यायालय

मागील वर्षांत कोरोनाच्या संकटामुळं अवघे दोनच लोकन्यायालये पार पडली. यंदा चार लोकन्यायालयांचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यातील पहिली लोकन्यायालय येत्या १० एप्रिल रोजी पार पडणार आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्यात १० एप्रिलला राष्ट्रीय लोक न्यायालय
SHARES

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत भरणार आहे. विविध प्रकारची प्रकरणे तडजोडीसाठी येथे ठेवली जाणार असून सर्व पक्षकारांनी या अदालतमध्ये सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख आर.एम.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचं कामकाज चालणार आहे. तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी लोक न्यायालयांचा उपक्रम फायदेशीर ठरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे लोक न्यायालये आयोजित करून तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय लोक न्यायालयांचं आयोजन केलं जातं.

मागील वर्षांत कोरोनाच्या संकटामुळं अवघे दोनच लोकन्यायालये पार पडली. यंदा चार लोकन्यायालयांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यातील पहिली लोकन्यायालय येत्या १० एप्रिल रोजी आहे. महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार ठाणे आणि पालघर जि’ाातील सर्व प्रकारच्या न्यायालयांमध्ये या लोकन्यायालयांचे आयोजन केले जाणार आहे. 

यात दिवाणी स्वरूपाची, फौजदारी स्वरूपाची तडजोडीस पात्र, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एन. आय. अ‍ॅक्टअन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुलीची प्रकरणे, मोटर अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, कामगारविषयक तंटे, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणीविषयक देयक प्रकरणे, महसूल आणि दाखल पूर्व प्रकरणे या लोक न्यायालयात तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा