Advertisement

दर रविवारी क्रिडाप्रेमींसाठी पाम बीच खुला करणार

पाम बीच रोडवरील एक लेन धावपटू, सायकलस्वार आणि चालणाऱ्यांसाठी दर रविवारी पहाटे 5 ते 10 या वेळेत खुली राहणार आहे.

दर रविवारी क्रिडाप्रेमींसाठी पाम बीच खुला करणार
SHARES

फ्लेमिंगो आणि इतर परदेशी पाहुण्यांनी गजबजलेला आणि विस्तीर्ण निसर्गरम्य खाडी असलेला नवी मुंबईतील बहुचर्चित पाम बीच रोड, नवीन वर्षापासून दर रविवारी सकाळी ठराविक वेळी क्रीडाप्रेमींसाठी खुला केला जाणार आहे.

नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे पाठवला आहे. त्यानुसार पाम बीच रोडवरील (palm beach road) एक लेन सायकलस्वार आणि धावपटूंसाठी दर रविवारी सकाळी 5 ते 10 या वेळेत खुली राहणार आहे.

तसेच या काळात येथे इतर खेळ करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा मार्ग खुला होणार आहे. या काळात आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना प्रवासात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे.

नवी मुंबईतील पाम बीच रोड हे नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या वाशी येथील मोरज सर्कल ते बेलापूर या आठ किलोमीटरच्या या मार्गावर दररोज सायकल आणि धावपटूंची रेलचेल पाहायला मिळते.

दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर नियमित सरावासाठी येणाऱ्या धावपटूंची संख्या मोठी आहे.

Advertisement

थंडीच्या हंगामात येथील पाणथळींच्या जागांवरील निसर्ग संपदा न्याहाळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा आकडाही बराच मोठा असतो. या मार्गावरील दोन्ही बाजूंनी 16 किलोमीटर अंतरावर सायकल चालवण्याला आणि धावण्याला (jogging) अनेकजण पसंती देतात.

या मार्गालगत असलेल्या ज्वेल ॲाफ नवी मुंबई तसेच महापालिका मुख्यालयालगत अनेक धावपटू प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षणाचे स्वतंत्र वर्गही चालविले जातात. त्यास मिळणारा प्रतिसाद हा अलिकडे क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून आरोग्याकडे (health) लक्ष देणाऱ्या मोठ्या वर्गास आकर्षित करू लागला आहे.

पाम बीच मार्गाचे हे महत्व लक्षात घेऊन आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी हा मार्ग रविवारच्या दिवशी ठराविक वेळेत केवळ क्रीडा प्रकारांसाठी खुला करता येईल का यादृष्टीने चाचणी सुरू केली होती. तथापी, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

Advertisement



हेही वाचा

मुंबादेवी मंदिर ट्रस्टचा 15 मजली पार्किंग टॉवर प्रकल्पाला विरोध

एलिफंटा बोट अपघात : 'तो' ठरला देवदूत, उद्धव ठाकरेंकडून कौतुक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा