महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजने अंतर्गत काटई नाका ते शीळ टाकीपर्यंत बारवी ग्रॅव्हिटी वाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा - मानपाडा आणि वागळे परिसरात गुरुवार दिनांक 27 जून 2024 रोजी दुपारी 12.00 ते शुक्रवार 28 जून 2024 रात्री 12.00 वाजेपर्यंत एकूण 24 तास ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या दरम्यान दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती आणि कोलशेत खालच्या गावातील रूपादेवी पाडा, किसन नगर क्रमांक 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समितीमधील सर्व भागात पाणीपुरवठा करण्यात आला. वागळे अंतर्गत प्रभाग समिती येथे पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.
या पाणीकपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेला (Thane municiple coproration) सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे (Thane) महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
हेही वाचा