Advertisement

वांद्र्यात इमारतीची लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू

इमारतीची लिफ्ट कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना वांद्र्यात घडली. मंगळवारी सकाळी ८.४९ वाजेच्या सुमारास या इमारतीची लिफ्ट अचानक कोसळली.

वांद्र्यात इमारतीची लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू
SHARES

सोमवारी संध्याकाळी घाटकोपर (पूर्व) येथील शांतीनगर पोलिस हाऊसिंग सोसायटीत इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी वांद्रे पश्चिम येथे इमारतीची लिफ्ट कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  राधेशाम हरिजैन (६०) असं या व्यक्तीचं नाव आहे


कशी कोसळली लिफ्ट?

राधेशाम हरिजैन वांद्रे पश्चिम येथील हॉली फॅमीली रुग्णालयाजवळ असलेल्या एव्हरेस्ट अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी 8.49 वाजेच्या सुमारास या इमारतीची लिफ्ट अचानक कोसळली. या लिफ्टमध्ये असलेले राधेशाम लिफ्ट कोसळल्यामुळं गंभीर जखमी झाले. त्यावेळी राधेशाम यांना वांद्र्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं भाभा रुग्णालयातील डॉ. रोहन यांनी सांगितलं.


हेही वाचा - 

घाटकोपरमध्ये लिफ्ट खाली कोसळून ४ जखमी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा