Advertisement

पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

सीगल अथवा कोणत्याही पक्षाला अप्रमाणित खाद्यपदार्थ खाऊ घालणे चुकीचे आहे.

पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
SHARES

पर्यटन स्थळे, उद्याने आणि पाणवठ्यांमध्ये पक्ष्यांना ब्रेड, भात, फरसाण, शेव, पाव, वेफर्स आणि पोळी असे हानिकारक पदार्थ खायला देणे बेकायदेशीर आहे. पक्ष्यांना त्यांच्या पचनसंस्थेसाठी योग्य नसलेले अन्न दिल्याने त्यांचे आरोग्य बिघडू शकते. तसेच त्यांचे जीवन देखील धोक्यात येऊ शकते. असे लोकमतने एका वृत्तात म्हटले आहे.

मुंबईत (mumbai) समुद्रकिनारे, खिडक्या आणि गॅलरीसारख्या ठिकाणी अनेक नागरिक पक्ष्यांना असे अन्न देत आहेत. पक्षीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे की ही पद्धत पक्ष्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करते आणि ती बंद केली पाहिजे.

त्याच वृत्तानुसार, निसर्गप्रेमी विजय अवसाणे यांनी सांगितले की, सीगल (seagull) पक्ष्यांना गोण्या भरून शेव आणि गाठिया टाकण्याचे प्रमाण काही वर्षांपूर्वी चौपाटीवर सुरू झाले होते. मात्र आता पक्ष्यांना खाऊ घालण्यावर बंदी केली आहे. तसेच वनरक्षक तैनात केल्याने हे प्रकार आता कमी झाले आहेत. 

तसेच अलिबाग (alibag) आणि एलिफंटा येथे लॉंचमधून जाणारे काही प्रवासी सीगल पक्षांना खाऊ घालतात. सीगल अथवा कोणत्याही पक्षाला अप्रमाणित खाद्यपदार्थ (food) खाऊ घालणे चुकीचे आहे. यासाठी लॉंचवर पक्षांना खाऊ घालू नका असे जागृत करणारे पोस्टर्स लावण्यात यावे.

मात्र असे असूनही काहीजणांकडून या नियमांचे उल्लंघन होतच आहेत. मात्र अशांना कठोर शिक्षा न देता 500 रुपये दंड (fine) आकारला जावा. असे कृत्य पुन्हा न करण्याचे हमीपत्र लिहून त्यांना सोडण्यात यावे.



हेही वाचा

मुंबई विमानतळावर प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू होणार

मुंबईतील लोकल प्रवाशांचे UPI ला प्राधान्य

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा