राज्यात (maharashtra) गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 26 सप्टेंबरला मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र दिवसभर पाऊस फारसा पडला नाही.
मात्र 26 सप्टेंबरच्या रात्री मुसळधार पाऊस झाला जो 27 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत सुरूच होता. मुंबई (mumbai) आणि परिसरात येत्या 6 ते 7 तास मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत पावसाने पुनरागमन केले. या पावसामुळे मुंबईत रात्रभर पाऊस (mumbai rains) सुरूच होता. अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला.
आज, 27 सप्टेंबर रोजी सकाळपासून ठाण्यात जोरदार पाऊस झाला. दुपारी 3 वाजता पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने आज मुंबई आणि ठाण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
25 सप्टेंबर रोजी मुंबईत अवघ्या 6 तासात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे 26 सप्टेंबर रोजी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या दिवशी तेवढा पाऊस पडला नाही. अशा स्थितीत 27 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळपासूनच चाकरमान्यांच्या मनात कामावर जायचे की नाही, अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती.
हेही वाचा