Advertisement

महानंदा दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ

11 फेब्रुवारीपासून नवीन दर लागू झालेत.

महानंदा दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ
SHARES

अमूल आणि गोकुळनंतर आता महानंद डेअरीनेही आपल्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रतिलिटर गाईच्या दुधासाठी 56 रुपये मोजावे लागणार आहेत. आधीच महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने महानंद डेअरीनेही शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या प्रतिलिटर दुधाचा दर 36 रुपयांवरून 37 रुपये केला आहे. तसेच दुधाच्या पाऊच पॅकिंग खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विक्री दरात वाढ केल्याचे महानंद डेअरीने स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी अमुलच्या दुधाच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. आता अर्धा लिटर अमूल ताजे दूध २७ रुपयांना मिळेल, तर त्याच्या १ लिटर पॅकेटची किंमत ५४ रुपये असेल. अमूल गोल्डचे अर्धा किलोचे पॅकेट म्हणजेच फुल क्रीम दूध आता ३३ रुपयांना मिळेल, तर १ लिटरसाठी ६६ रुपये मोजावे लागणार आहेत.

याशिवाय अर्धा लिटर अमूल गाय दूध म्हणजेच अमूल गायीच्या दुधाची किंमत २८ रुपये असेल, तर १ लिटरसाठी ५६ रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, अमूल ए२ म्हशीच्या दुधाची अर्धा लिटर किंमत ३५ रुपये असेल, तर एका लिटरसाठी ७० रुपये मोजावे लागतील.

काही दिवसांपूर्वी अमूल आणि गोवर्धनने दूधाच्या दरात वाढ केली, त्यापाठोपाठ आता गोकूळनेही दूधाचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोकूळ दुधाच्या दरात एक लीटरमागे 2 – ४ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गोकुळचे फुल क्रीम मिल्कची किंमत यापूर्वी 69 होती, ती आता 3 रुपयांनी वाढवून 72 इतकी करण्यात आली आहे.

दुधाची मागणी वाढत असून पुरवठा कमी असल्याने सगळीकडे दुधाची टंचाई जाणवत आहे. यात उन्हाळ्यात उत्पादनात थोडी घट होत मागणी वाढणार वाढणार आहे. यात सर्वच दूध कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केल्याने आता गोकुळने दरवाढ केली आहे. त्यानुसार म्हैस आणि गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.हेही वाचा

वरळी: इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून दगड पडून अपघात, दोघांचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा