भारतीय गुप्तचर यंत्रणांचा एजंट असल्याचा आरोप करत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात आता देशभरातून आवाज उठू लागला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आणि कुलभूषण यांची सुटका व्हावी म्हणून आंदोलने होत आहेत.
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी 'हिंदू युवा' संघटनेने आंदोलन केले. या वेळी त्यांनी पाकिस्तानचा निषेध करीत पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसेच कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी भारत सरकारने जोरदार प्रयत्न करावेत अशी मागणीही केली.