मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) स्थानकावर एका तरुण रेल्वे कर्मचाऱ्याचा ड्युटीवर मृत्यू (accident) झाला. मध्य रेल्वे (central railway) मध्ये पॉइंट मॅन म्हणून हा तरूण काम करत होता. कोणार्क एक्स्प्रेसचे लोकोमोटिव्ह त्याच्या डब्यांसह जोडत असताना ही घटना घडली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्म 16 वर दुपारी 3:10 च्या सुमारास हा अपघात झाला. 23 वर्षीय सूरज सेठ हा मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसच्या डब्ब्यांना लोकोमोटिव्ह जोडत असताना तो दोघांमध्ये चिरडला गेला आणि त्यात त्याचा मृत्यु झाला.
भारतीय रेल्वेमधील सुरक्षा श्रेणीमध्ये पर्यवेक्षणाचा अभाव आणि मनुष्यबळाच्या कमतरतेबद्दल रेल्वे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. “ही घटना घडली तेव्हा कोणीही देखरेख करत नव्हते. विशेषत: सुरक्षा श्रेणींमध्ये मनुष्यबळाची तीव्र कमतरता आहे, ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,” असे राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियनच्या नेत्याने सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेठला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाईच्या कारणास्तव कामावर ठेवण्यात आले होते, ते देखील रेल्वे कर्मचारी होते. “आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करत आहोत.,” असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या एका केंद्रीय नेत्याने सांगितले.
योगायोगाने, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत जाहीर केले की, 2024-25 च्या अर्थसंकल्पात वाटप केलेल्या 2,62,000 कोटींपैकी ₹1,08,000 कोटींहून अधिक विशेषतः सुरक्षा श्रेणींसाठी वाटप केले जाईल.
हेही वाचा