रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा लाडका कुत्रा गोवा देखील दु:खी असल्याचं आपण पाहिलं. सध्या एक बातमी व्हायरल होतेय त्यानुसार, रतन टाटांच्या निधनांतर त्यांच्या लाडका कुत्रा गोवा देखील जग सोडून गेला आहे. पण मुंबई पोलिसांनी या व्हायरल पोस्टचे खंडन केले आहे.
व्हॉट्सअॅप वर व्हायरल होणारी माहिती पूर्णपणे खोटी आहे. कुत्रा जिवंत आहे. गोव्याच्या मृत्यूबद्दलचे मेसेज खोटे आहेत.
मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी गोव्याच्या कुत्र्याबाबत व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेल्या फॉरवर्ड्सची दखल घेतली आणि त्याच्या मृत्यूबाबतच्या खोट्या बातम्यांचा खंडन केले.
'गोवा'चा मृत्यू झाल्याचा व्हॉट्सॲप मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला. "दुःखद बातमी... टाटांचा पाळीव कुत्रा गोवा 3 दिवसांनंतर मरण पावला ..त्याच्या मृत्यूच्या .. म्हणूनच ते म्हणतात की कुत्रे माणसांपेक्षा त्यांच्या मालकांना अधिक विश्वासू असतात," असे या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये नमूद केले आहे.
मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी रतन टाटा यांचे जवळचे मित्र आणि सहाय्यक शंतनू नायडू यांच्याशी यासंदर्भात पडताळणी केली. कुडाळकर यांनी सांगितले की रतन टाटा यांचा गोवा कुत्रा जिवंत आहे.
याबात त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहली. त्यामध्ये म्हटले आहे की, "स्वर्गीय रतन टाटा जी यांच्या पाळीव कुत्र्याचे, निधन झाल्याबद्दल एक व्हॉट्सॲप मेसेज फिरत आहे. मी याची पडताळणी शंतनू नायडू यांच्याशी केली, जे टाटा जींचे जवळचे मित्र म्हणूनही ओळखले जातात आणि त्यांनी पुष्टी केली की गोवा ठीक आहे. कृपया खात्री करा. पोस्ट शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पहा.”
हेही वाचा