सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. (Redevelopment of 25 buildings of Sindhi refugees in Sion Koliwada)
या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी गुरु तेज बहादूर नगर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली असून 41 हजार 500 चौ. मीटर क्षेत्रफळावर 25 इमारती आणि 1200 फ्लॅट होते. या इमारती पाडण्यात आल्या आहेत. मात्र रहिवाशांच्या व्यतिरिक्त उर्वरित जागा व्यावसायिक झोपड्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. (Mumbai News)
म्हाडाच्या माध्यमातून बांधकाम आणि विकास एजन्सी नेमून या जमिनीवरील इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता मिळाली आहे. या पुनर्विकासासाठी प्रत्येक इमारतीतील किमान 51 टक्के भाडेकरू किंवा एकूण भाडेकरूंच्या किमान 60 टक्के किंवा पुनर्वसन योजनेतील रहिवाशांची संमती आवश्यक आहे.
या संदर्भात गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या देखरेखीखाली एक उच्चाधिकार समिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे.
हेही वाचा