बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळाने भरारी पथके नेमण्याचे ठरवले आहे. उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेबाबत होत असणारी हेळसांड थांबावी, यासाठी भरारी पथके नेमणार असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये बोर्डाच्या उत्तरपत्रिका तापसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर बोर्डावर उत्तरपत्रिकांच्या सुरक्षतेबाबत ताशेरे ओढले गेले. त्याचप्रमाणे दहिसर येथील इस्रो शाळेत मुख्याध्यापकांच्या खोलीतून उत्तरपत्रिका चोरीला गेल्या. त्यातील काही उत्तरपत्रिका सापडल्या मात्र अद्याप काही उत्तरपत्रिकांचा शोध लागायचा आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तरपत्रिका तापसणी केंद्राेवर भरारी पथके नेमण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. ही भरारी पथके उत्तरपत्रिकांची तपासणी व्यवस्थित होत आहे की नाही? उत्तरपत्रिका बाहेर तर नेली जात नाहीये? यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवणार आहेत.