Advertisement

मुंबईत ६५ ठिकाणी स्ट्रीट फूड हब उभारणार

या स्ट्रीटमध्ये राज्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जाईल. यामध्ये मोदक, पुरणपोळी, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, थालीपीठ यासारख्या पदार्थांचा समावेश असेल.

मुंबईत ६५ ठिकाणी स्ट्रीट फूड हब उभारणार
SHARES

मुंबईत ६५ ठिकाणी स्ट्रीट फूड हब उभारले जाणार आहेत. सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे स्ट्रीट फूड हब सुरु राहणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईत स्ट्रीट फूड हब उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ६५ ठिकाणं शोधली आहेत. यामध्ये ३३३१ विक्रेत्यांचा समावेश केला जाणार आहे. या ६५ ठिकाणांच्या मदतीने मुंबईतील विक्रेते फूड ट्रक्स किंवा सामान्य स्टॉल्समध्ये विविध प्रकारचे अन्नपदार्थ विकू शकणार आहेत.

या स्ट्रीटमध्ये राज्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जाईल. यामध्ये मोदक, पुरणपोळी, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, थालीपीठ यासारख्या पदार्थांचा समावेश असेल. स्ट्रीटसाठी ३५०० जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. याठिकाणी मिळणाऱ्या स्ट्रीट फूडच्या माध्यमातून मराठी लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात फूड हब तयार करण्यासाठी आणि फुटपाथ सुशोभित करण्यासाठी उड्डाणपूल आणि उड्डाणपुलांखालील जागांसाठी २०० कोटी प्रस्तावित केले आहेत. 

या फूड ट्रक्सवर किंवा गाळ्यांमध्ये अन्नपदार्थांच्या विक्रीव्यतिरिक्त अन्य काहीही विकता येणार नाही. यासाठी फूड किंवा विविध गाळ्यांच्या मालकांना महापालिकेचा आरोग्य विभाग, परवाना आणि  दुकाने व आस्थापने विभाग तसेच वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागेल.



हेही वाचा -

मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा