Advertisement

बोरीवलीतील पादचारी पूल २० जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला


बोरीवलीतील पादचारी पूल २० जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला
SHARES

एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सोयीसाठी रखडलेल्या पादचारी पूलांना मूर्त रूप देण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यानुसार अाता बोरीवलीतील पादचारी पूलाच्या विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात असून हा पूल २० जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार अाहे. १४ नोव्हेंबर २०१७ रोजी या पुलासाठी पश्चिम रेल्वेनं निविदा मागवल्या. १७ नोव्हेंबर रोजी पूलाच्या कामाला सुरुवात झाली. १२ मीटर रुंद असलेल्या या पूलाच्या विस्तारीकरणाचं काम काही दिवसांत पूर्ण होऊन तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. अवघ्या २ महिन्यांत विस्तारीकरणाचं काम झालं असून हा एक विक्रम असल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनानं म्हटलं अाहे.


२ कोटी ३५ लाख रुपये खर्च

पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी पुलाच्या विस्तारीकरणासाठी २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या पुलामुळे बोरीवली स्थानकात पुर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांना विशेष फायदा होणार आहे. तसंच उपनगरीय रेल्वे, मेल‚ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या पुलाचा फायदा होणार आहे, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा