केंद्रीय मंत्री पियुष गोयल (piyush goyal) यांनी शनिवारी सांगितले की, मुंबईतील वन राणी म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (sanjay gandhi national park) आत धावणारी टॉय ट्रेन (toy train) पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि ही सेवा या वर्षी जूनपर्यंत पर्यटकांसाठी खुली केली जाईल.
द इंडीयन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार 1970 मध्ये नॅरोगेज मार्गावर ही टॉय ट्रेन सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ती डिझेल इंजिनवर 2.7 किमी लांबीच्या मार्गावर धावत असे. तसेच दर 30 मिनिटांनी या गाड्या धावत असत आणि त्यात किमान 20 प्रवाशांची क्षमता होती.
तथापि, 2021मध्ये चक्रीवादळामुळे टॉय ट्रेनचे ट्रॅक खराब झाले होते. त्यानंतर प्रशासनाने टॉय ट्रेनचे मार्ग दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले.
एसजीएनपीचे संचालक अनितल पाटील म्हणाले की, नवीन ट्रेनमध्ये दोन वेगवेगळ्या रोलिंग स्टॉक संच असतील.
"एका रोलिंग स्टॉकमध्ये चार व्हिस्टा-डोम कोच असतील, तर दुसऱ्या स्टॉकमध्ये चार ओपन सीटिंग कोच असतील. प्रत्येक स्टॉकमध्ये चार बोगी असतील. एजन्सीने आम्हाला आश्वासन दिले आहे की सर्व काम 31 मे पर्यंत पूर्ण होईल. म्हणून, आम्ही जून पर्यंत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत," असे अनितल पाटील यांनी द इंडीयन एक्सप्रेसला सांगितले .
पुनर्संचयनाचे काम रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) ला देण्यात आले होते आणि प्रकल्पाचा खर्च 45 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी 43 कोटी रुपये गुंतवले आहेत. टॉय ट्रेनचा मार्ग 5.5 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतो, ज्याला कृष्णगिरी उपवन म्हणूनही ओळखले जाते.
हेही वाचा