मध्य रेल्वेच्या कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका 26 वर्षीय तरुणीने प्राण गमावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. मरण पावलेल्या तरुणीचं नाव रिया राजगोर असं असून ती डोंबिवलीत राहत होती. गर्दीमुळे लोकलच्या डब्यात आतमध्ये शिरता न आल्याने रिया धावत्या लोकलमधून कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान पडली. या दुर्घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिला मृत्यू झाला.
रिया ही ठाण्यामधील एका बांधकामासंदर्भातील कंपनीमध्ये कामाला होती. सोमवारी तिने डोंबिवली स्थानकामधून ठाण्याच्या दिशेला जाणारी अप मार्गावरील लोकल ट्रेन पकडली. ट्रेनला गर्दी होती. मात्र थोडं पुढे गेल्यानंतर आतमध्ये जागा होईल आणि आपण आत सरू असं वाटल्याने रियाने फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला.
ट्रेन डोंबिवलीवरुन सुटली तेव्हा रिया ही फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या माहिलांपैकी एक होती. तिच्यासोबतच्या काहीजणींना आतमध्ये शिरता आलं. मात्र गर्दी असल्याने तिला आतमध्ये शिरताच आलं नाही. बराचवेळ ती दारामध्ये लटकून उभी होती. तिने अशा अवघडलेल्या अवस्थेत बराच अंतर प्रवास केला. लोकलने वेग पकडल्यानंतर कोपर स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रुळावर पडली. तिच्या डोक्याला इतक्या जोरात दणका बसला की जागीच तिने प्राण सोडला. रियाच्या घरी आई-वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.
दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या खाडीत पडून डोंबिवलीतील अवधेश दुबे या तरुणाचा मृत्यू झाला. तो मुंबईच्या दिशेने लोकल ट्रेनने प्रवास करत होता. डब्यात गर्दी असल्याने तो दाराला लटकून प्रवास करत होता. पोस्ट मुंब्रा ट्रे ट्रेनने वेग घेतला आणि गर्दीमुळे तोल गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
मागील आठवड्यामध्ये म्हणजेच 23 एप्रिल रोजी दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून अवधेश दुबे नावच्या तरुणाचाही अशाचप्रकारे अपघाती मृत्यू झाला होता. मुंब्रा खाडीजवळ त्याचा हात सटकल्यानंतर तो खाडीत पडला आणि याच दुर्घटनेत त्याने प्राण गमावले.
हेही वाचा