वसईतील काही भागात शुक्रवारी 28 आणि शनिवारी 29 पाणीपुरवठा बंद राहण्याचे जाहीर केल्याने पाणी समस्या उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.
वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या एमएमआरडीए योजनेजवळ विजेच्या रोहित्रामध्ये मंगळवारी बिघाड निर्माण झाला.
वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या एमएमआरडीए योजनेच्या कवडसा पंपिंग स्टेशन येथील महावितरण विभागाचे ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे.
बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीला वेळ लागला. त्यामुळे गुरुवारी अनियमित, कमी दाबाने पुरवठा झाला. वीज संकटामुळे वसई-विरार शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
शुक्रवारी सकाळी 5 ते शनिवारी सकाळी 5 वाजेपर्यंत वसईतील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यात वसईतील नवघर पूर्व, रामदास नगर, संभाजी नगर, आझाद नगर, संत जलराम नगर, एव्हरशाईन, वसंत नगरी, आचोळा, मधूबन विभाग, परेरा नगर या भागातील वितरण पूर्णपणे बंद राहील, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.
हेही वाचा