विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शुक्रवारी सकाळी संरक्षक भिंत कोसळल्याने चार घरांची पडझड झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्रीपासून पावसाने मुंबईत पुन्हा दमदार हजेरी लावली. गुरुवारी रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षा नगर परिसरातील संरक्षक भिंतीला मुसळधार पावसामुळे मोठे तडे गेले होते. ही बाब काही रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी कुटुंबासह घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
मात्र शुक्रवारी सकाळी चार घरे पूर्णपणे कोसळली. घटनेचे वृत्त समजताच महापालिका आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आजूबाजूची धोकादायक घरे रिकामी केली.
हेही वाचा