मुंबईतल्या अनेक भागातील पाणीपुरवठा 7 आणि 8 जुलै रोजी बंद राहणार आहे. पाईपलाईनच्या दुरुस्ती कामासाठी शुक्रवारी 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 8 जुलैच्या सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईतल्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
मरोळ-मरोशीपासून माहीम-रुपारेल ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा बंद राहणार आहे. त्यामुळे कफ परेड, नरिमन पॉईंट, कुलाबा, बोरीबंदर, बॅकबे, रिज रोड, पेडर रोड, नेपियन्सी रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल, एस. एल. रहेजा रोड, सेनापती बापट मार्ग, गोखले रोड, भवानी शंकर रोड, बीडीडी चाळ, एस. व्ही. एस. रोड, गणपतराव कदम मार्ग, वरळी, पेरी रोड, खारदांडा, माउंट मेरी, पाली माला रोड, मुंबई सेंट्रल, मदनपुरा, नागपाडा, आग्रिपाडा, क्लार्क रोड, जीजामातानगर, डी. सी. रोड, रिक्लेमेशन, बाजार रोड, कोलडोंगरीसह अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही.
डोंगरी, नागदेवी रोड, युसुफ मेहेरअली रोड, बाबुला टँक
त्यामुळे मुंबईकरांनी 'सांभाळून पाणी वापरा', असे आवाहन पालिकेने केले आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)