Advertisement

सर्वाधिक कमान तापमान कुलाब्यात

राज्यात सर्वाधिक किमान तापमान बुधवारी कुलाबा येथे नोंदवण्यात आले. पुढील पाच दिवस वातावरण असेच कोरडे असेल आणि किमान पुढील दोन दिवस तरी वातावरणात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्वाधिक कमान तापमान कुलाब्यात
SHARES

राज्यात सर्वाधिक किमान तापमान बुधवारी कुलाबा येथे नोंदवण्यात आले. पुढील पाच दिवस वातावरण असेच कोरडे असेल आणि किमान पुढील दोन दिवस तरी वातावरणात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईतील सांताक्रूझ येथील कमाल तापमान बुधवारीही सरासरीपेक्षा ४.६ अंशांनी अधिक होते. मंगळवारी सांताक्रूझ इथं ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. तर बुधवारीही ३७.५ कमाल तापमान नोंदवले गेले. मात्र मंगळवारपेक्षा बुधवारी मुंबईकरांना उकाडा अधिक जाणवला.

कुलाब्यामध्ये बुधवारी ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मंगळवारच्या तुलनेत कुलाब्यातील तापमानात १.८ अंशांची घट झाली. मात्र हे तापमान अजूनही सरासरीपेक्षा १.५ अंशांनी अधिक आहे. कोरड्या हवेमुळे उष्मा आणि त्यामुळे उकाड्याची जाणीव अधिक होत आहे. दरम्यान, दक्षिण आणि उत्तर कोकण भागात सर्वच ठिकाणी मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल तापमानाचा पारा उतरला आहे.

Advertisement

बुधवारी मुंबईच्या कमाल तापमानासोबत किमान तापमानही चढले होते. कुलाबा येथे बुधवारी २५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.४ अंशांनी जास्त होते. तर सांताक्रूझ येथे २३.५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. हे तापमानही सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक होते.

राज्यात सर्वाधिक किमान तापमान बुधवारी कुलाबा येथे नोंदवण्यात आले. त्या खालोखाल डहाणू येथे २४.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा होता. हे तापमान सरासरीपेक्षा ३.१ अंशांनी अधिक होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा