विरार (virar) येथील अर्नाळा (arnala) इथे मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आहेत. वसई-विरार, मुंबई (mumbai) आणि आसपासच्या शहरातून मोठ्या प्रमाणात या रिसॉर्ट्सना लोकांची गर्दी होताना दिसून येते. जास्तीच्या पैशांसाठी येथील रिसॉर्ट मालक क्षमतेहून जास्त लोकांना प्रवेश देतात.
यामुळे गर्दीचे प्रमाण वाढून अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. कमी जागेच्या स्विमिंग पूलमध्ये क्षमतेहून जास्तीची गर्दी झाल्याने पोहताना तसेच पाण्यात खेळताना अपघात घडतात. अशीच एक दुर्दैवी घटना विरार येथील रिसॉर्ट (resort) मध्ये घडली.
विरारमधील अर्नाळा येथील विसावा रिसॉर्ट मधील स्विमिंग पूलमध्ये बुडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू (death) झाला. स्विमिंग पूलमध्ये (swimming pool) पोहत असताना डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
नालासोपारा (nala sopara) येथे राहणार्या 5 मित्रांचा एक ग्रुप मंगळवारी अर्नाळ्याच्या नवापूर येथील विसावा रिसॉर्ट मध्ये सहलीसाठी आले होते. दुपारी सर्व जण पाण्यात पोहत होते. साडेतीनच्या सुमारास सत्येंद्र कुमार सरोज (25) याने स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी उडी मारली.
मात्र तो पाण्यातून वर आला नाही. त्याच्यासोबत असणार्या मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी तो जोरात श्वास घेत होता आणि काही वेळेतच तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी अर्नाळा येथील महालक्ष्मी रुग्णालयात दाखल कण्यात आले. त्याच्या डोक्याला मार लागला होता.
त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची प्रकृती अधिक खालावली आणि त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
‘स्विमिंग पूलमध्ये पोहताना डोक्याला ईजा झाल्याने सत्येंद्रकुमार याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे’, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलिसांनी दिली.
हेही वाचा