भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि हिटमॅन रोहित शर्मा याची आयसीसी 'वनडे क्रिकेटर ऑफ द इअर २०१९' (ODI cricketer of the year) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसंच, भारताचा कर्णधार विराट कोहली याची 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' (spirit of cricket) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या पुरस्कारांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे.
5️⃣ #CWC19 centuries
— ICC (@ICC) January 15, 2020
7️⃣ ODI centuries in 2019
Your 2019 ODI Cricketer of the Year is Rohit Sharma.#ICCAwards pic.twitter.com/JYAxBhJcNn
मागील वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतानं दिमाखदार विजय मिळवला. त्यावेळी हा सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची खिल्ली उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला लक्षात येताचं त्यानं थेट प्रेक्षकांना खडसावलं. तसंच, त्यानं स्टीव्ह स्मिथसाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगितलं व या प्रकारासाठी प्रेक्षकांच्या वतीनं स्मिथची माफी मागितली होती. विराट कोहलीच्या या कृतीनं सर्वांचीच मनं जिकली.
Who remembers this gesture from Virat Kohli during #CWC19?
— ICC (@ICC) January 15, 2020
The Indian captain is the winner of the 2019 Spirit of Cricket Award 🙌 #ICCAwards pic.twitter.com/Z4rVSH8X7x
हिटमॅन रोहित शर्मानं मागील वर्षी वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये १० शतक झळकावली होती. यापैकी ५ शतक ही इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत केली होती.
ICC Awards 2019 Winners List :
हेही वाचा -
मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच, भाजप नेता बरळला
महागडा प्रवास, चर्चगेट ते प्रभादेवी प्रवासासाठी उबरचं बिल ४ लाख