अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन नुकतीच अटक केली आहे. लकडावालाची अटक हे मुंबई पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. सध्या तो पोलीस कोठडी आहे. मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत एजाज लकडावाला होता. 37 प्रकरणात एजाज लकडावाला गुन्हेगार आहे. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
नुकत्याच एका प्रकरणात लकडावालासह महाराज ही सहभागी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली आहे. महाराजच्या घराची ही पोलिसांनी झडती घेतली असून त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. महाराज विरोधात पोलिसांनी 384, 34 भा.द.वि कलामासह गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
याआधी मुंबई विमानतळावर एजाज लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. सोनिया मनीष अडवाणी या नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे ती देशाबाहेर पळून जात होती. तिची चौकशी केली असता एजाज लकडावालासंबंधी माहिती उघड झाली होती. बिहार पोलिसांच्या टीमची मदत घेऊन पटना विमानतळावर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ८ जानेवारीला रात्री ९ वाजता एजाज लकडावालाला अटक करण्यात आली.