मुंबईवर 'ट्रामाडोल'चं सावट


मुंबईवर 'ट्रामाडोल'चं सावट
SHARES

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या आणि सर्वत्र बंदी असलेल्या ट्रामाडोल गोळ्यांची सध्या नशेच्या बाजारात सध्या चलती आहे. वर्षभरात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभाग आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १६० कोटींच्या या गोळ्या हस्तगत केल्या आहेत. इसीस या दशतवादी संघटना जखमी झाल्यानंतर वेदना शमवण्यासाठी या गोळ्यांचा वापर करत असल्याचं प्रकर्शाने पुढे आलं आहे.


१६ लाख ४१ हजार गोळ्या हस्तगत

इसीस ही दहशतवादी संघटना जखमींना वेदना शमवून घेण्यासाठी या गोळ्या ते मागवत असल्याचं लक्षात आल्यानंतर या गोळ्यांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे बाजारात या गोळ्यांची किंमत कैकपटीने वाढली. काही दिवसांपूर्वी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पालघर, नवी मुंबई, येथील गोदामांवर कारवाई करत, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या १६ लाख ४१ हजार ट्रामाडोलच्या गोळ्या हस्तगत केल्या होत्या. या सर्व गोळ्या आखाती देशातून इसीस या दहशतवादी संघटनेसाठी आफ्रीकन देशामार्फत पाठवल्या जाणार होत्या. याप्रकरणात कालांतराने ठाणे पोलिसांनी चौघांना अटक करत त्यांच्याजवळून दोन लाख गोळ्या हस्तगत केल्या.


२३ कोटींचा साठा जप्त

मागील वर्षी देशात या गोळ्यांचा २३ कोटींचा साठा जप्त करण्यात आला होता. मात्र यावर अंकुश बसेल असा अंदाजही तपास यंत्रणांनी लावला होता. मात्र तसं न घडता. यावर्षी गोळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात आढळून आल्या.

मागील वर्षीच्या तुलनेत २०१८ मध्ये १६० कोटी रुपयांच्या गोळ्यांचा साठा डीआरआयने हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे यातील १५१ कोटींचा साठा हा मुंबईतूनच हस्तगत केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा