गोरेगावच्या आरे काॅलनीतील युनिट क्रमांक -३ परिसरातील एका तलावात १७ वर्षांचा तरूण बुडाल्याची घटना घडली आहे. संतोष सिंग (१७) असं या तरूणाचं नाव असून तो त्याच्या मित्रांसोबत या तलावात पोहोण्यासाठी उतरला होता. तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने संतोष बुडाल्याचं म्हटलं जात आहे.
गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील युनिट क्रमांक-३ परिसरात तलाव तयार करण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकराची सुरक्षा व्यवस्था नसून स्थानिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जात अाहे. याचाच फटका संतोषला बसला. साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
संतोष त्याच्या मित्रांसोबत या तलावात पोहोण्यासाठी गेला होता. पोहोताना खोल पाण्यात बुडल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि स्थानिक पोलिस दाखल झाले असून या घटनेचा तपास करत आहेत.
हेही वाचा-
कुर्ला टर्मिनसमध्ये ५२३ स्टार कासव जप्त
एमडीची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत