पालघर : 4 वर्षांच्या मुलीची हत्या करून आदिवासी महिलेची आत्महत्या

ही घटना सोमवारी डहाणू परिसरातील सिसणे गावात घडली.

पालघर : 4 वर्षांच्या मुलीची हत्या करून आदिवासी महिलेची आत्महत्या
SHARES

महाराष्ट्रातील पालघर (palghar) जिल्ह्यात खून (murder) आणि आत्महत्या (suicide) अशा धक्कादायक घटना घडली. 

महाराष्ट्रातील (maharashtra) पालघर जिल्ह्यात एका 23 वर्षीय आदिवासी महिलेने तिच्या 4 वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. ही घटना सोमवारी डहाणू परिसरातील सिसणे गावात घडली.

या घटनेत आईनेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:चे जीवनही संपवले. संबंधित महिलेचा पती मच्छीमार (Fisherman)असून तो वारंवार कुटुंबापासून दूर असायचा. रविवारी तो घरी परतला आणि मित्रांसोबत बाहेर गेला. त्याने सोबत न नेल्याने त्याची पत्नी नाराज होती आणि त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

कासा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेचा पती मच्छीमार होता आणि तो वारंवार कुटुंबापासून दूर असायचा. रविवारी तो घरी परतला आणि मित्रांसोबत बाहेर गेला. जाताना तिला सोबत घेऊन न गेल्याने  पत्नी नाराज होती आणि याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

सोमवारी, महिलेने कथितपणे तिच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली, असे अधिकऱ्याने सांगितले.

शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा

मध्य रेल्वेच्या आषाढी यात्रेसाठी 64 विशेष गाड्या

नवी मुंबई : लोकल ट्रेन पकडताना महिला पडली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा