मुंबईच्या डोंगरी परिसरात ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून डोंगरी पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला या प्रकरणी अटक केली आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या तपासणीत आरोपी संशयीत पोते घेऊन जात असताना दिसल्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्याच्याविरोधात हत्या व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सुशांतनं आत्महत्येपूर्वी 'या' अभिनेत्याला केला होता फोन, पण...
मृत मुलगी डोंगरी येथील घरा बाहेर ३० मे ला खेळत होती. बराच वेळ मुलगी घरी न आल्यामुळे आईन तिचा शोध घेतला. अखेर मुलगी कुठेच न सापडल्यामुळे कुटुंबियांनी याप्रकरणी डोंगरी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी परिसराती अनेक सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी एक संशयीत पोते घेऊन जात असल्याचे आढळले. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फेकल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीच्या मदतीने रविवारी या मुलीचा मृतदेह वाडीबंदर येथील तंबाखु गल्लीत सापडला. अखेर याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा- मी ‘राजनिष्ठ’, राज ठाकरेंच्या वाढदिवसाला नांदगावकरांची भावनिक पोस्ट
त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिली. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी तेथील भटेर खान्यात हेल्पर म्हणून कामाला आहे. मुलीला एकटी पाहिल्यानंतर आरोपीने हा विकृत प्रकार केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.