महाराष्ट्र सायबर पोलिसांनी कुख्यात दाऊद इब्राहिम, लॉरेन्स बिश्नोई यांचे टी-शर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांसह ई-कॉमर्स वेबसाइटवर गुन्हा दाखल केला आहे. या वेबसाइट्सवर दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोई यांची छायाचित्रे असलेले टी-शर्ट विकले जात होते.
महाराष्ट्र सायबर विभागाने गुरुवारी माहिती दिली की, त्यात फ्लिपकार्ट, अली एक्सप्रेस, टी शॉपर्स आणि Etsy सारख्या प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट्स तसेच त्यांच्यावर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सायबर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून महाराष्ट्र सायबर विभाग सोशल मीडिया तसेच डिजिटल मीडियावर लक्ष ठेवून आहे. यावेळी सामाजिक परिस्थितीवर विपरीत परिणाम करणाऱ्या अशा पोस्ट आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाते.
यावेळी, तपासात नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि दाऊद इब्राहिम यांची छायाचित्रे असलेले टी-शर्ट फ्लिपकार्ट, अली एक्सप्रेस, टी शॉपर्स आणि Etsy सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होते.
गुन्हेगारी जीवनशैलीचा गौरव करणारी उत्पादने तरुणांवर नकारात्मक परिणाम करू शकतात. या प्रकारचा मजकूर समाजाच्या नैतिक मूल्यांना हानी पोहोचवतो आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा गौरव करतो. त्यामुळे तरुणांवर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडू शकतो, असे सांगत कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा