अखेर मुख्यमंत्र्यांना मिळाला सायबर पोलिस ठाण्यासाठी मुहूर्त

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी चार सायबर पोलिस ठाणी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेनंतर केली होती. त्यानंतर स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्यांसाठी वांद्रे येथे जागाही निश्चित झाली होती.

अखेर मुख्यमंत्र्यांना मिळाला सायबर पोलिस ठाण्यासाठी मुहूर्त
SHARES
 एकीकडे सरकार ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी आग्रह धरत असताना सायबर सुरक्षेच्या आघाडीवर मात्र कमालीची अनास्था दिसून येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी चार स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे उभारणार असल्याची घोषणा केली. अखेर  पोलिस ठाणी उभारणीच्या कामाला मुहूर्त मिळाला असून १५ जून रोजी वांद्रे येथे सायबर पोलिस ठाण्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.


सत्ता स्थापनेनंतर घोषणा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी चार सायबर पोलिस ठाणी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेनंतर केली होती. त्यानंतर स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्यांसाठी वांद्रे येथे जागाही निश्चित झाली होती. मात्र अद्याप पोलिस ठाण्याचं भूमिपूजन करण्यात आलं नव्हतं. बीकेसीतील अवघ्या एकाच सायबर पोलिस ठाण्यावर मुंबईतील सर्व गुन्हे नोंदवले जात होते.

अपुरेे मनुष्यबळ आणि गुन्ह्यांचा वाढता आलेख लक्षात घेता अखेर आयुक्तांनी सर्वच पोलिस ठाण्यात सायबर कक्ष सुरू केले खरे. मात्र आश्वासनांपलीकडे काही हाती लागले नाही.  अखेर चार वर्षानंतर मुख्यमंत्र्यांना आपली आश्वासनेे आठवली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी चार नवीन सायबर पोलिस ठाण्याच्या भूमिपूजनासाठी वांद्रे येथे येत आहेत.


४६ सायबर लॅब

आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरून सायबर गुन्ह्यांना आळा या सायबर पोलिस ठाण्यातून घातला जाणार आहे. मुंबईतील सायबर गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी दोन अशी चार सायबर पोलिस ठाणी उभारण्यात येणार होती. या पोलिस ठाण्यांसाठी मुंबई पोलिसांनी पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूकही करण्यात आली आहे.  राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोल‌िस आयुक्तालय क्षेत्रात ४६ ‘सायबर लॅब’ उभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता.



हेही वाचा  -

नायर रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला

तनुश्री दत्ताच्या विनयभंगप्रकरणी नाना पाटेकरांना दिलासा, पुरावा नसल्याचा पोलिसांचा अहवाल




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा