आझाद मैदान - बांगलादेशींना बनावट भारतीय नागरिकत्व देणाऱ्या लतिफ गाझील याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हे बनावट भारतीयत्व नागरिकत्व बनवण्यासाठी या टोळीनं नगरसेवकांच्या शिफारसपत्राचा वापर केला.
आझाद मैदान पोलिसांनी टोळीच्या मास्टरमाईंडला जरी अटक केली असली तरी अजून किती जण या टोळीमध्ये आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत . मात्र जेलमध्ये असलेले बांगलादेशी या कागदपत्रांचा वापर करून जामिन मिळवतात हेही तितकच खरं. याच बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांना पासपोर्टही मिळतो. त्यामुळे संबधित संस्था कागदपत्रांची पडताळणी करूनच या गोष्टी देत असल्याचा दाव करत असल्या तरी अशा पद्धतीमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.