बोरिवली (borivali) रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी सुमारे आठ तिकीट तपासकांवर (ticket collector) गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी जुबेर अहमद (२७) हे खारघर (kharghar) येथे राहतात आणि एका खासगी कंपनीत ते कर्मचारी आहे.
सोमवारी दुपारी 2च्या सुमारास ते अंधेरी (andheri) ते विरार (virar) असा प्रवास करत होते. बोरिवली (borivali) स्थानकापूर्वी तिकीट तपासक डब्यात चढला आणि तिकीट तपासू लागला. तेव्हा अहमदने तिकीट खरेदी केले नसल्याचे समोर आले.
त्यानंतर तिकीट तपासक त्याला बोरिवली (borivali) स्थानकाच्या केबिनमध्ये घेऊन गेला. जिथे सुमारे आठ तिकीट तपासकांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप प्रवासी जुबेर अहमद यांनी केला आहे. त्यामुळे अहमद यांनी बोरिवली (borivali) रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मात्र, रेल्वे प्रशासनाच्या एका सूत्राने शिवीगाळ आणि शारीरिक मारहाण केल्याचा विरोध केला. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्रवासी अतिशय उद्धट होता तसेच सुरुवातीला त्याने दंड भरण्यास देखील नकार दिला. म्हणून तिकीट तपासकाने त्याला बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात आणले. जेथे प्रवाशाने अखेर दंड भरला आणि तेथून ते निघून गेले.
मात्र, प्रवासी दोन ते तीन तासांनंतर बोरिवली (borivali) रेल्वे स्थानकावर परतले आणि त्यांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा